नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
आगामी लोकसभा Marathi Live News निवडणुकीपूर्वी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅॅटबद्दल होणाऱ्या राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देशभरात जनजागृती मोहीम राबविणार आहे. महाराष्ट्रासह ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम असेल, तर अलीकडेच विधानसभा निवडणुका झालेली पाच राज्ये यातून वगळली आहेत. काँँग्रेससह इंडिया आघाडीतील घटकपक्षांकडून इव्हीएम व्दारे मतदानावर शंका उपस्थित करण्यात आली होती.
निवडणूक आयोग ३५०० हून Marathi Live News अधिक प्रात्यक्षिक केंद्रे आणि जवळपास ४२५० मोबाईल व्हॅॅनव्दारे जनजागृती मोहीम राबविणार आहे. इव्हीएम मशीनव्दारे मतदान प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅॅटचा प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून दिला जाणार आहे. जनजागृती मोहीम लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयोजित केली जाते. अनेक लोकांना इव्हीएमबद्दल समज गैरसमज आहेत.
त्यातील गैरसमज दूर कारणे. नागरिकांना इव्हीएम मशीनची ओळख करून देणे. या जनजागृती मोहिमेत नागरिकांना इव्हीएम चे वैशिष्ट्ये सांगणे, मतदानाच्या प्रक्रीयेबद्दल माहिती देणे, या संदर्भात नागरिकांना प्रशिक्षण देणे. व्हीव्हीपॅॅटच्या पावत्यांची सत्यापना कशी करावी याची माहिती देणे. मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील ३४६४ विधानसभांंमध्ये जनजागृती होणार आहे. यात ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तर ६१३ जिल्ह्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यांना या मोहिमेतून वगळले आहे.
No comments:
Post a Comment