Saturday, January 6, 2024

आजपासून तीन दिवस थंडी अन् पाऊस Marathi Live News

Marathi Live News
पुणे : 

अरबी समुद्रासह बंगालच्या Marathi Live News उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीसह उत्तर भारतात नव्याने तयार होणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात ७ ते १० जानेवारी या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस अन किमान तापमानात घट होऊन थंडीतही वाढ होईल. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभाव वाढल्याने राज्यात रविवार ते मंगळावर असा तीन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

उत्तर भारतातील सर्वच राज्यात नवा पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. त्या भागात ४ ते ८ अंशावर तापमान खाली आल्याने पुन्हा Marathi Live News थंडीची लाट तीव्र झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ७ ते १० जानेवारी दरम्यान सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पडेल तसेच किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घट होईल. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

शनिवारचे तापमान . 

नाशिक १३.५, पुणे १४.६, अहमदनगर १७.५, जळगाव १६.८, कोल्हापूर १९.४, महाबळेश्वर १४.१, मालेगाव १७, सांगली १९.७, सातारा १७.५, सोलापूर १७.७, छत्रपती संभाजीनगर १६.९, परभरणी १७.१, नांदेड १८.८, अकोला १९, अमरावती १७.९, बुलढाणा १६.४, चंद्रपूर १५.४, गोंदिया १६.६, नागपूर १८.९, वाशिम १६.६ 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...