Saturday, February 10, 2024

'चलो दिल्ली' शेतकऱ्यांच्या मोर्चाने वाढलं टेन्शन; हरियाणाची सीमा सील, इंटरनेट बंद Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन डेस्क : 

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर Marathi Live News यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारने शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या प्रस्तावित 'चलो दिल्ली' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट, एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. 

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी १३ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी 'चलो दिल्ली' मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे हा यां मोर्चाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाझीपूर सीमेवर बॅॅरिकेडिंग केले असून अनेक जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत निलंबित Marathi Live News करण्याची घोषणा केली आहे. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सर, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यामध्ये सेवा बंद करण्यात आल्या आहेत. 

हरियाणा प्रशासनाने जरी केलेल्या अधिसुचणेनुसार व्हाॅॅईस कॉल वगळता मोबाईल नेटवर्कवर प्रदान केलेल्या एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा निलंबित राहतील. हा आदेश रविवारी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील. असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...