Tuesday, February 13, 2024

रात्री, पहाटे गारठा ; तर दिवसा कडक उन्हाच्या झळा : नागरिक हैराण Marathi Live News

 Marathi Live News
पुणे : 

राज्यातील किमान तापमानात Marathi Live News घट आणि कमाल तापमानात वाढ असे विचित्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमानात १२.३ अंशांवर खाली आल्याने ते राज्यात नीचांकी ठरले. उत्तर भारतातील शीतलहरी व बंगालच्या उपसागरात तयार झालेला उच्च दाबाचा पट्टा यामुळे दिवसा कडक उन आणि रात्री व पहाटे गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावर उच्चदाबाचा पट्टा (अँँटीसायक्लोन) प्रभावाखाली बाष्पयुक्त वारे वाहत आहे . 

त्यामुळे देशातील काही Marathi Live News भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस सुरु आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर होत असून किमान पहाटे व रात्रीचे किमान तापमानात कमी होत आहे. 

दिवसभराच्या कमाल तापमानात दुपारी वाढ होत आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानात सुमारे २२ ते २३ अंशांचा फरक निर्माण झाल्याने कडाका असेच वातावरण आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी , खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...