Wednesday, February 21, 2024

धक्कादायक ! प्रसिद्ध कवी , गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन Marathi Live News

Marathi Live News
पुणे : 

प्रसिद्ध कवी, गझलकार , महाराष्ट्र Marathi Live News साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह, दीपक करंदीकर यांचे रात्री १२:३० वाजता दुःखद निधन झाले. आठ दिवस त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीपक करंदीकर कवी, गझलकार व लेखक म्हणून चार दशकांपासून सुपरिचित आहेत. 

मराठी साहित्यविश्वातील Marathi Live News महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे ते स्थानिक कार्यवाह होते. हे पद ते गेली तीस वर्षे भूषवित आले होते. 'धुनी गझलांची' (२००१) , 'कविकुल' (२००९) हे गझलसंग्रह व कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, ' गझलगंगा' हा गझलसंग्रह प्रशासनाच्या वाटेवर आहे. तसेच, 'अभिनव श्रीव्यंकटेश महात्म्य (२०१६), 'संगीत श्रीनिवास- पद्मावती विवाह नाट्य' - पाच अंकी संगीत नाटक (२०२०) ही श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. करंदीकर गेल्याने साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे अशी भावना जनमानसातून उमटत आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...