Thursday, February 22, 2024

रामलल्लाच्या चरणी महिन्यात १० किलो सोने अर्पण Marathi Live News

 Marathi Live News
आयोध्या : 

उत्तर प्रदेशची धार्मिक Marathi Live News राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. या कालावधीत देशातील ६० लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. प्रत्येक भाविक आपापल्या कुवतीनुसार रामलल्लासाठी देणगी आणि आभूषणे अर्पण करीत आहेत. 

लाडक्या रामलल्लासाठी 

लाडक्या रामलल्लासाठी रोख रकमेच्या स्वरुपात २५ कोटींहून अधिक रक्कम प्रभू रामाच्या चरणी अर्पण केली आहे. सोने-चांदीच्या आभूषणापासून बनविलेल्या विविध वस्तूंची भेटही देण्यात आली आहे. २५ किलो चांदी आणि १० किलो सोने राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत जमा झाले आहे. 

२३ जानेवारीपासून सार्वजनिक 

२२ जानेवारी रोजी Marathi Live News रामलल्लाच्या मूर्तींची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुसऱ्या दिवसापासून प्रभू रामलल्लाचे दरवाजे देशवासीयांसाठी खुले करण्यात आले. 

विविध आभूषणे 

रामलल्लासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून बनविलेली आभूषणे अर्पण केली जात आहेत. सोन्या-चांदीच्या भांडयासह हार, मुकुट, चुडी, खेळणी, पायल, धनुष्यबाण, अगरबत्ती स्टँँड , दीप आदी विविध आभूषणांचा यामध्ये समावेश आहे. 

दर्शनाची वेळ 

भाविकांची गर्दी रोज वाढत असल्याने दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...