![]() |
| Marathi Live News |
नाशिक : वैभव कातकाडे
जिल्हा परिषदेच्या Marathi Live News पशुसंवर्धन विभागणे कुपोषित बालकांसाठी कोंबडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारी (दि.९) सुरगाणा तालुक्यातील ३४ कुपोषित बालकांच्या पालकांना प्रत्येकी २५ कोंबड्या आणि तीन नर कोंबड्यांंचे वाटप केले जाणार आहे. या कोंबड्यांच्या अंड्यामुळे बालकांचे पोषण होण्यास मदत होणार असून. त्यांच्या पालकांना देखील अंड्यांच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात अतिगंभीर कुपोषित आणि मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी Marathi Live News पशुसंवर्धन विभाग कोंबड्या देणार आहे. कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते. त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते. तसेच अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. जे दीर्घकाळ उर्जा टिकवून ठेवतात. अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंड्यामध्ये कॅल्शिअम, व्हीटॅॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सेस निधीतून पाच लाखांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पाच लाख रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. कोंबड्यासोबतच त्या कोंबडीच्या वाढीसाठी लागणारे खाद्यदेखील जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पुरविणार आहे. साधारण २० आठवड्यांचे खाद्य यामधून पुरवले जाणार आहे.

No comments:
Post a Comment