Friday, February 9, 2024

विजांच्या कडकडाटासह आजपासून पावसाची शक्यता Marathi Live News

Marathi Live News
पुणे : 

बंगालच्या उपसागरात Marathi Live News तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात शनिवारी (दि.१०) पासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र १० ते १२ तर विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तिसगड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस होईल. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

कोकण वगळता सर्वत्र पावसाची शक्यता 

राज्यात कोकण वगळता Marathi Live News सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात १० ते १२ असे तीन दिवस तर विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होईल. वाऱ्याचा वेग वाढल्याने सोसाट्याचा वारा अन विजांच्या कडकडाटा सह पाऊस होईल. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...