![]() |
| Marathi Live News |
देशात होऊ घातलेली Marathi Live News अठरावी लोकसभा निवडणूक देशासह जगभरातील आजवरची सर्वात महागडी निवडणूक ठरण्याची शक्यता एका अंदाजानुसार आहे. आगामी निवडणुकीत १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्ची पडेल, असा अंदाज राजकीय खर्चावर लक्ष ठेवणाऱ्या सेंटर फॉर मिडिया स्टडीज (सीएमएस) या संस्थेने वर्तविला आहे. अमेरिकेत २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत सुमारे १.२ लाख कोटी रुपये खर्च झाले होते. याहून अधिक रक्कम आगामी निवडणुकीत भारतात खर्ची पडण्याचा 'सीएमएस' चा अंदाज खरा ठरल्यास स्वाभाविकपणे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
आकडे बोलतात
६० हजार कोटी Marathi Live News रुपये (जाहीर व अघोषित मिळून ) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खर्च झाले होते.
९५ लाख रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला घालून दिली आहे.
२० दिवसांच्या प्रचारावर प्रत्यक्षात एका उमेदवाराचे सरासरी ५.७५ कोटी रुपये खर्ची पडतील.
५४३ जागांवर प्रत्येक उमेदवाराला खर्च काढल्यास तो प्रचार व जाहिरात खर्च व्ग्लाता ३.११२ कोटी रुपये खर्च होईल.
९७ कोटी मतदार देशात आहेत.
१२४० रुपये खर्च प्रतिमतदार होईल.
- १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा 'सीएमएस' चा अंदाज
- मर्यादा ९५ लाखांची, प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवाराला खर्च होणार सरासरी सहा कोटी

No comments:
Post a Comment