ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
लोकसभा निवडणुकीच्या Marathi Live News पार्श्वभूमीवर १५ महानगरपालिकेमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त संवर्गातील ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, सांगलीचे आयुक्त सुनील पवार, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व केशव जाधव, वसई-विरार महापलिकेतील पाच उपयुक्त, नवी मुंबईचे चार उपयुक्तांच्या समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या Marathi Live News आदेशावरून वसई विरार महापालिकेचे उपयुक्त पंकज पाटील, डॉ.विजय व्दासे, तानाजी नरळे, चारूलता पंडित, नयना ससाणे यांची बदली झाली आहे. नवी मुंबई महापालिकेचे उपयुक्त बाळासाहेब राजळे, मनोज महाले, श्रीराम पवार, भिवंडीचे दीपक झिंझाड, पनवेल महापालीकेतील उपयुक्त सचिन पवार, गणेश शेटे, कोल्हापूरच्या उपयुक्त शिल्पा दरेकर आणि उल्हासनगरचे विजय नाईकवाडे यांची बदली झाली आहे.
नागपूर महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन, रविंद्र भेलावे, पिंपरी चिंचवडचे अजय चारठाणकर, मिनीनाथ दंडवते, नाशिकचे श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर, छत्रपती संभाजी नगरचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त नंदा गायकवाड, सांगली मिरजचे पंडित पाटील, राहुल रोकडे, अहमदनगरचे सचिन बांगर, अजित निकत, नांदेड महापालिकेचे पंजाब खानसोले धुळ्याच्या पल्लवी शिरसाठ, लातूरच्या मयुरा शिंदेकर, चंद्रपुरचे उपायुक्त अशोक गराटे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
No comments:
Post a Comment