Thursday, March 21, 2024

पूर्णा तालुक्यात भूकंपाचा धक्का ; भीतीने लोक घराबाहेर पळाले Marathi Live News

 Marathi Live News
पूर्णा : आनंद ढोणे 

पूर्णा तालूका Marathi Live News परिसरात सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची ४.२ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवली आहे. सकाळी झोपेतून उठण्याच्या सुमारासच भूकंपाचा  धक्का बसला. यात घरावरील टीनपत्रे हादरली गेल्याने भीतीने लोक घराबाहेर पळाले. 

३० वर्षांपूर्वी लातूर जिल्हा किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी सुमारे ४० सेकंद ६.४ रिश्टर स्केलवरील तीव्र भूकंपाने हादरला होता. घरे पडून हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले होते. त्याची पुनरावृत्ती गुरुवारच्या सौम्य धक्याने टळल्यामुळे नागरिकांनी  सुटकेचा निश्वास सोडला. 

दरम्यान, या Marathi Live News भूकंपाच्या धक्याने भयभीत होत नागरिक मुला बाळांसह तातडीने घराबाहेर पडले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू  हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून १५ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी या भूकंपाचे दोन धक्के जाणवले. अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याचीही माहिती समोर येत आहे. भुगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होऊन त्याची परिणीती तीव्र सौम्य भूकंप लहरी तयार होवून पृथ्वीवरील पृष्ठभागाची हालचाल  होत असे शास्त्रज्ञाकडून सांगितले जात आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...