लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यामुळे कीटकनाशक प्राशन केलेले इरोड येथील मारूमालार्ची Marathi Live News द्रविड मुन्नेत कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए गणेशमूर्ती यांचे आज (दि.२८ मार्च ) हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. २४ मार्च रोजी गणेशमूर्ती यांनी टोकाचे पाऊल उचलत कीटकनाशक करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कोईम्बतूरमधील येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
२४ मार्च रोजी सकाळी ७६ वर्षीय गणेशमूर्ती यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या होऊ लागल्या. कीटकनाशक प्राशन केले असल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले.त्यांना तत्काळ इरोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल Marathi Live News केले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले होते. आज पहाटे हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
गणेशमूर्ती यांनी १९९८ मध्ये पलानी आणि २००९ मध्ये इरोडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर गणेशमूर्ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इरोड लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment