Thursday, March 21, 2024

वैजापूर-नाशिक मार्गावरील नांदगाव परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार Marathi Live News

Marathi Live News
वैजापूर; पुढारी वृत्तसेवा : 

वैजापूर नाशिक रस्त्यावर Marathi Live News  नांदगाव शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची  घटना बुधवारी (दु.२१) रात्री घडली. अमन हनीफोद्दीन शेख (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वैजापूर शहरातील खान गल्ली भागात राहत होता. एका खासगी रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत होता. 

या घटने बाबत मिळालेल्या Marathi Live News माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास अमन हा दुचाकीवर नांदगावच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे अमन हा गंभीर जखमी झाला. नागरिकांनी तातडीने अमन यास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...