कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : .jpg)
Marathi Live News
गेल्या काही दिवसापासून Marathi Live News सोन्याच्या दरात सुरु असलेल्या वाढीचे सातत्य आजही कायम राहिले शुक्रवारी, दि.२९ रोजी सोने दराने पूर्वीचे सर्व उच्चांक मोडीत काढले, २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर ७०२०० रुपयांवर गेला आहे. चांदीचा दर काहीसा स्थिर राहिला असून. चांदी ७६,500 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होत असलेला चढ-उतार आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे ही यामागील कारणे आहेत. लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढत असल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने सोने खरेदीकडे लोकांचा कल अद्याप कायम आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या खरेदीच्या वेळी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दि.२८ च्या तुलनेत Marathi Live News चांदीचे दर स्थिर राहिले. दरात होत असलेली वाढ ही गुंतवणूकीसाठी चांदीची मागणी वाढल्यामुळे आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि लग्नसराईत होणारी सोने खरेदी यावर भाववाढीचे सावट असले तरी भाववाढीचा ट्रेंड आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह कायम राहील, असा अंदाज शहरातील सरफांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment