Tuesday, April 2, 2024

नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार: गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागातील घटना Marathi Live News


Marathi Live News

गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर नक्षलवादी मोठा घातपात Marathi Live News करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्वर्भूमीवर पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरु होती. या कारवाईत आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच या चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात आज सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरु होती या चकमकेमध्ये आठ नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे आगामी लोकसभा Marathi Live News निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक 

महाराष्ट्र मध्ये आगामी काळात लोकसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका राज्यात पाच टप्प्यात होणार असून यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे असे पाच दिवशी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी किंवा दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क झाली होती. या सुरक्षा यंत्रणेला आता मोठे यश मिळाले आहे.  

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...