 |
| Marathi Live News |
मुंबई : साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपली मक्तेदारी कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी १०९ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करीत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशात १०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधामुळे साखरेच्या उत्पादनात मूळ अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.
गतवर्षी पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकाचा परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यात हंगामाच्या सुरुवातीस ८५ लाख मेट्रिक टन तर सुधारित अंदाजानुसार ९५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्याप्रमाणे देशातही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता केंद्राने वर्तविली होती. त्यामुळे २०२४-२०२४ च्या गाळप हंगाम सुरु होताच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. परिणामी साखरेचे उत्पन्न वाढले. राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या २०७ साखर कारखान्यापैकी १८९ बंद १५ एप्रिलपर्यंत झाले. मराठवाड्यातील १८ कारखान्यांचे गाळप अध्याप सुरु झाले. आतापर्यंत १०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून यात आणखी वाढीची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment