Tuesday, April 23, 2024

नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम- प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे Marathi Live News

 

Marathi Live News

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

राष्ट्रवादी काँँग्रेस (अजित पवार गट) चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत Marathi Live News उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे Marathi Live News राष्ट्रीय प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, संजय तटकरे आणि मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात २००४ ते २००९ मध्ये राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे तर २००९ ते २०१४ पर्यंत मधे समीर भुजबळ खासदार होते. सध्या नाशिक लोकसभेत राष्टवादीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम आहे. असे परांजपे यांनी स्पष्ट केले. 


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...