पुढारी ऑनलाईन डेस्क : 
Marathi Live News
महादेव बेटिंग अॅॅप प्रकरणी Marathi Live News अभिनेता आणि उद्योजक साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणले जात आहे.
साहिल खान 'द लायन बुक अॅप नावाच्या सट्टेबाजी अॅपशी जोडलेला आहे. जो महादेव बेटिंग अॅप नेटवर्कचाही भाग आहे. आज त्याला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व Marathi Live News जामिन आणि अटकेतून दिलासा न मिळाल्याने तो मुंबईतून पळून गेला होता. तब्बल ४० तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले . तो वारंवार त्याचे लोकेशन बदलत होता. याआधी गुरुवारीही महादेव बेटिंग अॅप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याची चार तासांहून अधिक काळ चौकशी केली होती.
No comments:
Post a Comment