Monday, April 29, 2024

शिंदेच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह हि चार नावं चर्चेत Marathi Live News

Marathi Live News

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतरहि महायुतीचे काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. जागावाटपात शिवसेना Marathi Live News शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आल्याने या जागांवर तिढा निर्माण झाला होता. दरम्यान, यातील काही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम आणि ठाणे या मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. तसेच या जागांवर शिंदे गटाकडून Marathi Live News उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. 

समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर ठाण्यामधून नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र नाशिकच्या जागेबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी शिवेसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. 

दरम्यान, या तिन्ही जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा ठाकरे गटाशी थेट सामना होणार आहे. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमदेवारी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...