![]() |
| Marathi Live News |
आज , बुधवारी मुंबई, ठाण्यासह रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक जिल्ह्यांमध्येहि रात्री Marathi Live News उष्मा जाणवू शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला.
सोमवारी सांताक्रुज येथे ३७.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्यानंतर मंगळवारी हा पार १.८ अंशांनी वाढला. सरासरीपेक्षा मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ६.३ अंशांनी अधिक होता. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा मंगळवारसाठी दिला होता. पालघरमध्येही हि लाट काही प्रमाणात जाणवली. डहाणू येथे मंगळवारी ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. आज, बुधवारीहि ठाणे, मुंबई, रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या तुरळक भागांत उष्णतेच्या लाटेची जाणीव होऊ शकते. पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रात्रीही उष्मा जाणवू शकेल. तर सातारा, सांगली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत २५ एप्रिलपर्यंतच्या १० दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात, तसेच लगतच्या गोवा व गुजरात राज्यांत गुरुवारपर्यंत दमट हवेचा आणि उष्णतेचा अनुभव येवू शकेल, असेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment