पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा 
Marathi Live News
साक्री शहरासह तालुक्यातील Marathi Live News माळमाथा व कटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे.
जिल्ह्यासह Marathi Live News तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे वाढलीच नव्हती. पावसाळा सुरु होण्यास अद्याप दोन ते अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढताच शेतातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे.
काही शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने मका, ऊस, ज्वारी, गहू,कांदा, बाजरी आदी पिकांना पाणी देताना बळीराजाची कसरत होत आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरी जेमतेम तग धरून आहेत. पिकांना मुबलक पानी मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत.
No comments:
Post a Comment