![]() |
| Marathi Live News |
नवी मुंबईत एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याचीMarathi Live Newsप्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.
नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी येथील नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रणMarathi Live Newsमिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. केमिकल कंपनीला आग लागल्याने किंवा ज्वाळा मोठ्या असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी असल्याने जवळपास अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. अध्यापर्यंत यात कोणीही अडकल्याचे किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

No comments:
Post a Comment