![]() |
| Marathi Live News |
जागतिक सकारात्मक Marathi Live News संकेतांमुळे भारतीय शेअर्स बाजाराने शुक्रवारी (दि.१०) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून ७२,९०० जवळ गेला. तर निफ्टी १५० अंकांनी वाढून २२,१०० हजारांवर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत ऑटो आणि एनर्जी शेअर्स आघाडीवर आहेत.
गुरुवारी सेन्सक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला होता. तर निफ्टी ३४५ अंकांनी English Live News घसरून २१,९५७ वर स्थिरावला होता. दरम्यान, कालच्या घसरणीतून आज सेन्सक्स आणि निफ्टी सावरले.
सेन्सेक्स आयटीसी, एशियन पेंटस, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, अॅॅक्सिस बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, इंडसइंड बँक , नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले, तर इन्फोसिस, एचसीएल टेक, एलटी हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टीवर बिपीसीएल, आयटीसी, एशियन पेंट्स, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी हे शेअर्स Hindi Live News टाॅॅप गेनर्स आहेत. तर इन्फोसिस, ग्रासीम हे शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
आशियातील जपानचा निक्केई निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. चीनमधील निर्देशांकही तेजीत आहेत. हाँँगकाँँगचा हँँगसेंग १ टक्क्यांनी वाढला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात तो आठ महिन्यांच्या उच्चांंकावर पोहोचला.
.jpg)
No comments:
Post a Comment