Sunday, May 5, 2024

एनसीसीएफ करणार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, कुठे असणार खरेदी केंद्र? Marathi Live News


Marathi Live News

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेत दिली. खरेदीचे लक्ष पाच लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी २.५ आणि एनसीसीएफसाठी २.५ मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. Marathi Live News

रब्बी खरेदी पीएसएस-२०२४ साठी एफपीओएस आणि शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साठवण उपलब्धता आणि एनसीसीएफची टीम खरेदीची तयारी तपासण्यासाठी विशाल सिंग पिंपळगाव बसवंत येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरयाणा आणि गुजरात येथूनही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीचे लक्ष ५ लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी २.५ आणि एनसीसीएफसाठी २.५ मेट्रिक टन Marathi Live News कांदा खरेदी करणार आहे. 
खरेदी धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांंना त्यांचा कांदा जमा करता यावा. यासाठी सुरुवातीला सुमारे ५० केंद्र उघडणार आहे. शेतकऱ्यांंसाठी पेमेंट यंत्रणा थेट लाभ हस्तांतरणद्वारे कार्यक्षमता सुनिश्चित असेल. ७ मेपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाफेडचे पुणे शाखा व्यवस्थापक परीक्षित एम. एसीसीएफचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोव्हर उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीमुळे निर्यातबंदी उठवली असून एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून फायदा होणार नसल्याची टीका शेतकऱ्यांंनी केली आहे. 

  

 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...