Tuesday, May 7, 2024

कोल्हापूर : परिते येथे रस्ता ओलांडताना भरधाव लक्झरी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू Marathi Live News

Marathi Live News

 कौलव ; पुढारी वृत्तसेवा 

परिते ता. करवीर येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने Marathi Live News जोरदार धडक दिल्यामुळे अंजनी रंगराव पाटील (वय ७७) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. 

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास अंजनी पाटील या काही कामानिमित्त जात होत्या. परिते बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून राधानगरी कडे जाणाऱ्या English Live News लक्झरी बसने (क्रमांक टी एस १२ यु इ ०३८२ ) त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. 

गावच्या प्रवेशव्दारातच अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली मात्र ग्रामस्थांनी ये जा Hindi Live News करणाऱ्या वाहनांना एकेरी मार्ग रिकामा करून दिला. भीषण अपघातातच वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. 


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...