Monday, May 20, 2024

सावधान! तापमान वाढतयं; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता Marathi Live News


Marathi Live News

राज्यात विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट वातावरण असून नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या विशेष तापमान बुलेटीननुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात सामान्य Marathi Live News तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची काल नोंद झाली.

उत्तर कोकणात कमाल तापमान ३५ ते ३८ दरम्यान होते. तर तळ कोकणात ३४ ते ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असल्याने बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. सामान्य तापमानाच्या तुलनेत मराठवाड्यात काल कमी तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान ३७ ते ४० अंशापर्यंत होते.

दरम्यान, नाशिक, जळगाव तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पार ४० पार गेल्याचे दिसून आले. काल नाशिक, मुंबई भागात लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने Marathi Live News भर उन्हात नागरिकांना थांबावे लागले.  

पुढील दोन दिवसात....

हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी तापमान वाढून पुन्हा तापमान घसरण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 

उत्तर कोकणात आजपासून तापमान वाढणार असून रायगड, ठाणे परिसरात उष्ण वातावरण असेल. मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात येत्या दोन दिवसात फार तापमानात फरक जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी भर उन्हात बाहेर जाणे टाळावे तसेच भरपूर पाणी पित राहण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...