Tuesday, May 7, 2024

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात Marathi Live News


Marathi Live News

CM Eknath Shinde : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दरम्यान मुंबईतून मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कार घुसविण्याचा आणि त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

Marathi Live News

Lok Sabha Election 2024 ची सगळीकडे धामधूम सुरु आहे. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यात मतदान झाले. दरम्यान मुंबईत एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका तरुणाने कार घुसविण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हा प्रकार का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. 
Marathi Live News

नेमकं घडलं तरी काय 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. याच मार्गीकेवरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कार चालकाला त्वरित लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सुसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला. 

कारचालकावर गुन्हा दाखल 

पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे. वांद्रे-वरळी सी-लिंग येथे रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे शुभमकुमार जगदीश कुमार असं नाव आहे. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कारण तरी काय 

पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने त्याला थांबविले. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाने हा प्रकार का केला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. इशारा देवून हा तरुण न थांबल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...