Wednesday, May 8, 2024

शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस Marathi Live News

Marathi Live News

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन पक्षांनी Marathi Live News अर्ज केले आहेत. या अर्जांवर अध्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

मात्र राजकीय कुरघोडीतून सभेसाठी ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता बीकेसी मैदानासाठी चाचपणी सुरु केली असल्याचे समजते. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मैदान कोणाला मिळणार यावरून वाद रंगणार असल्याची चर्चा आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला आता अवघे १२-१३ दिवस उरले असून मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. येत्या काही Marathi Live News दिवसात मुंबईत मोठ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे हे निश्चित आहे. त्याकरिता राजकीय पक्षांनी अर्ज केले आहेत. 

येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षांनी अर्ज दिले आहेत. त्यामुळे या दिवशी सभा घेण्यासाठी कोणाला परवानगी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत अध्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पक्षांचे अर्ज आलेले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून राज्य सरकारने त्यावर अध्याप काहीच निर्णय कळविलेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...