![]() |
| Marathi Live News |
देशातील छोट्या शहरांमध्ये दोन-तीन वर्षांत तरुण व्यावसायिक आणि लघु उद्योजकांची संख्या वेगाने वाढली आहे. Marathi Live News मोरबी, वापी, पानिपत, लुधियाना, तिरुपूर, रायपुर, डेहराडून, जमशेद्पूर व राजकोटमध्ये २ कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या तरुणांची वाढती संख्या पाहता मोठ्या शहरांत काम करणारे जवळपास ४ हजार वेल्थ मॅनेजर्स आता छोट्या शहरांकडे वळत आहेत. मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट लिमिटेड, ३६० वन वेल्थ अँड अॅसेट मॅनेजमेंट, व्हाइटओक कॅपिटल एएमसी आदि कंपन्या छोट्या शहरांमध्ये नवी कार्यालये सुरु करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, मजबूत जीडीपी वृद्धी, शक्यतांनी भरलेले आर्थिक वातावरण, उच्च बचत दर व संपन्न तरुणांच्या संख्येत होणारी वाढ टियर-२ व टियर-३ शहरांतही वेल्थ मॅनेजमेंटक्षेत्राला प्रगतीचा आधार देत आहे. यासाठी आयपीओ, Marathi Live News रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या सुवर्णसंधी आहेत.
डिसेंबरमध्ये विक्रमी नवे रेस्टॉरंट
छोट्या शहरांमध्ये डिसेंबरपर्यंत विक्रमी संख्येने पब, बार आणि क्लाऊड किचन सुरु करण्याची तयारी आहे. मॅकडोनाल्ड नवी दिल्लीसह कोलकता, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तर प्रदेशात १८ आऊटलेट सुरु करणार आहे. तर मॅसिव्ह रेस्टॉरंटस समूह भोपाळ, चेन्नई व रायपुरमध्ये नव्या रेस्टॉरंटसह ३० क्लाऊड किचन सुरु करण्याच्या तयारीत आहे. एनसीआरमध्ये पुढील तीन महिन्यांतच १०० पेक्षा अधिक छोटे-मोठे रेस्टॉरंट उघडतील.

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
