![]() |
| Marathi Live News |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिवाळा सुरु झाला कि Marathi Live News भारतातील अनेक शहरांतील हवा प्रदूषण वाढते. सुमारे सहा वर्षांपूर्वी चीनमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे होती. २०१७ मध्ये खराब हवा गुणवत्ता मानांकनात चीनमधील ७५ शहरांचा, तर भारतातील १७ शहरांचा समावेश होता. पण सहा वर्षांनंतर ही परिस्थिती खूपच बदलली आहे.
२०२२ च्या यादीनुसार जगातील सर्वाधिक १०० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ६५, तर चीनमधील केवळ १६ शहरे आहेत. वाहन निर्मिती आणि कोळसा वीज प्रकल्पांची संख्या कमी केल्याने चीनमधील प्रदूषण कमी झाले असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या जून महिन्यात जागतिक बँकेच्या प्रकाशित Marathi Live News झालेल्या एक अहवालानुसार, वाढत असलेल्या सूक्ष्म कणांमुळे श्रमिकांची उत्पादक क्षमता कमी होत असल्याचे भारताच्या जीडीपीचे दरवर्षी ०.५६ टक्के नुकसान होते. ९ नोव्हेंबर पूर्वीच्या तीस दिवसांत दिल्ली प्रदूषण बीजिंगपेक्षा १४ पट अधिक होते. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे दरवर्षी भारतात २१ लाख लोकांचा मृत्यू होतो. ही संख्या २०१९ मध्ये १६ लाख इतकी होती.
.jpg)
No comments:
Post a Comment