दक्षिण कोरियात जन्मदराची Marathi Live News समस्या भयावह बनल्यामुळे तेथील बुयाँँग ग्रुप नावाच्या कंपनीने जन्मदर वाढविण्यासाठी अनोखी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी तब्बल ६२.१२ लाख रुपये देणार आहे.
जन्मदर वाढविण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या Marathi Live News जवळच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्च आणि त्यांच्या मुलांसाठी महाविद्यालयीन शिकवणीचा खर्च समाविष्ट आहे. 'द कोरिया टाइम्स' च्या मते, यावर्षी केवळ ७० कर्मचारी कंपनीने घोषित केलेल्या ऑफरसाठी पत्र आहेत. कंपनी भविष्यात हे धोरण सुरु ठेवणार आहे. मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भर, कम आणि कौटुंबिक जीवन संतुलित करण्यात अडचण हे प्रमुख घटक जन्मदर घटण्यामागे असल्याचे एका सरकारी अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बुयाँँग ग्रुपने याकामी पुढाकार घेतला आहे.

No comments:
Post a Comment