हुपरी, पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
स्टेट्स लावल्याच्या Marathi Live News कारणावरून पट्टणकोडोली (ता.हातकणगले ) येथे गुरुवारी रात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. ठाकरे गटाचे शहरप्रमुख अण्णासाहेब जाधव यांना बेदम मारहाण करण्यात अआली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे कम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून हुपरी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी होती.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पट्टणकोडोली येथील विठ्ठल राम्मान्न या जाधव समर्थकांनी व्हाॅॅटसअॅॅपवर स्टेट्स लावला होता. या स्टेट्सवरून ठाकरे गटाचे शहरप्रमुख अण्णासाहेब जाधव यांचा मुलगा प्रथमेश व राम्मान्ना यांच्यात व्हाॅॅटसअॅॅपवर वाद झाला. त्यानंतर राम्मान्ना संतप्त झाले. ते समर्थकांसह जाब विचारण्यासाठी आण्णासाहेब जाधव यांच्या घराजवळ गेले असता तिथे वादावादी होऊन मारामारी झाली .
यात जाधव यांना Marathi Live News जबर मार लागला. त्यांच्या पत्नी व मुलातही मारहाण झाल्याचे समजते. त्यांनी हुपरी पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरु होते. यासंदर्भात गावात तणावपूर्ण शांतता आहे. राम्मान्ना यांच्यासह सहा ते सात जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
No comments:
Post a Comment